MHA Recruitment 2021: गृह मंत्रालयात नोकरीसाठी नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर आहे. कारण गृह मंत्रालयात विविध पदांसाठी लॉ ऑफिसर ग्रेड वन, लॉ ऑफिसर ग्रेड 2, अकाउंट्स ऑफिसरसह अन्य पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. अशातच ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी mha.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल.(BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटमध्ये ट्रेनी इंजिनियरच्या 40 पदांसाठी नोकर भरती, 21 मे पर्यंत करता येणार अर्ज)
उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अर्ज प्रक्रिया 24 मे 2021 रोजी संपणार आहे. अशातच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लवकरच अर्ज करावा. कारण तारीख निघून गेल्यानंतर अर्ज स्विकारला जाणार नाही आहे. नोकरी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृक वेबसाइटला भेट द्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.(DRDO Apprentice Recruitment 2021: डीआरडीओ मध्ये अपरेंटिसच्या 79 पदांसाठी नोकर भरती, 'या' पद्धतीने करा अर्ज)
कंसल्टेंट-06 पद
चीफ सुपरवायजर-05 पद
तर गृहमंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर भरती संबंधित अधिसुचनेसाठी लॉ ऑफिसर ग्रेड वन वर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून डिग्री घेतली असावी. या व्यतिरिक्त या फिल्ड मध्ये कमीतकमी पाच वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. लॉ ऑफिसर ग्रेड सेकेंडच्या पोस्ट वर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून लॉ मध्ये डिग्री घेतलेली असावी. या व्यतिरिक्त या फिल्डमध्ये 3 वर्षांचा अनुभव असावा. तसेच उमेदवाराला कंप्युटरची माहिती असावी.