NABARD Recruitment 2020: राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांनी त्यांच्या विविध भागात स्पेशालिस्ट अंतर्गत स्पेशालिस्ट कंसल्टेंट पदांसाठी नोकर भरतीची घोषणा केली आहे. त्याचसोबत या नोकर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या आणि योग्य उमेदवारांनी नाबार्डची अधिकृत वेबसाईट nabard.org येथे जाऊन ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी फॉर्म भरु शकता. त्याचसोबत खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन सुद्धा ऑफिशल नोटिफिकेशन डाऊनलोड करु शकणार आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येत्या 23 ऑगस्ट पर्यंतची मुदत उमेदवारांना देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना लक्षात असू द्या की, अर्ज प्रक्रियेसाठी शुल्क भरण्याची तारीख 23 ऑगस्ट आहे.नाबार्ड स्पेशालिस्ट कंसल्टेंट भरती 2020 ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मसाठी येथे क्लिक करा
रिक्त पदांसह अन्य महत्वाची माहिती
>>प्रोजेक्ट मॅनेजर- 1 पद, वेतन 3 लाख रुपये प्रति महिना
>>सिनियर अॅनालिस्ट-इन्फोर्मेशन सिक्युरिटी ऑपरेशन्स- 1 पद, वेतन 2.5 लाख रुपये प्रति महिना
>>सिनियर अॅनालिस्ट-नेटवर्क/एसडीडीडब्ल्यूएएन ऑरेशन्स- 1 पद, वेतन 2.5 लाख रुपये प्रति महिना
>>प्रोजेक्ट मॅनेजर – आईटी ऑपरेशन्स / इंफ्रास्ट्रक्चर सर्विसेस – 1 पद - वेतन 2.5 लाख रुपये प्रति महिना
>>अॅनालिस्ट-कम-चीफ डाटा कंसल्टेंट – 1 पद - वेतन 3.75 लाख रुपये प्रति महिना
>>साइबर सिक्यूरिटी मॅनेजर (सीएसएम) – 1 पद- वेतन 3.75 लाख रुपये प्रति महिना
>>अॅडिशनल साइबर सिक्यूरिटी मॅनेजर (एसीएसएम) – 1 पद - वेतन 2.5 लाख रुपये प्रति महिना
>>अॅडिशनल चीफ रिस्क मॅनेजर – 2 पद - वेतन 3 लाख रुपये प्रति महिना
>>रिस्क मॅनेजर (क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क, कंप्लायंस रिस्क, ईआरएमएस आणि बीसीपी) – 4 पद - वेतन 2.5 लाख रुपये प्रति महिना
नाबार्ड स्पेशालिस्ट कंसल्टेंट पदांसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांना घाटकोपर किंवा कांदिवली स्थित असलेल्या नाबार्ड क्वार्टर्स मध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे. परंतु राहण्याची सोय उपलब्ध न झाल्यास त्यांना नियुक्त करण्यात आलेल्या पदांनुसार निर्धारित हाउस रेंट अलाउंस (एचआरए) दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे.