मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरु, कशी असेल प्रवेशप्रक्रिया
student filing form (Photo Credits: Independent)

नुकताच बारावीचा निकाल (HSC Board Exam Result 2019)लागला आणि विद्यार्थ्यांची धावाधाव सुरु झाली करिअरच्या पुढील वाटचालीसाठी. यंदा बारावीचा राज्यातील एकूण निकाल 85.88% इतका लागला. तर बारावीच्या परीक्षेला एकूण 14,21,936 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी मुलींचा निकाल 90.25% आणि मुलांचा निकाल 82.40% लागला. बारावीचा निकाल म्हणजे आपल्या करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे आपल्याला हव्या त्या शाखेत, क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरु होते. त्यासाठी योग्य ते महाविद्यालय निवडण्यासाठी मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) प्रवेशपूर्व ऑनलाईन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे.

ही ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 29 मे ते 10 जून 2019 पर्यंत असणार आहे. अॅडमिशन फॉर्मच्या अर्जाची प्रिंट आऊट घेऊन ती महाविद्यालयात सादर करण्याची तारीख 7 जून ते 13 जूनपर्यंत असणार आहे. हे अर्ज दुपारी 12 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. इन हाऊस प्रवेशप्रक्रिया आणि अल्पसंख्यांक कोट्याची प्रवेशप्रक्रिया याच कालावधीत होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यांनी मेरिट लिस्ट जाहीर होईल.

मुंबई विद्यापीठाची ही ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी mum.digitaluniversity.ac ह्या संकेस्थळाला क्लिक करुन अर्ज भरावे. अर्ज भरताना काही अडचणी आल्यास 02066834821 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा.

HSC Board Exam 2019 Results: आयपॅडवर 12 वी ची परीक्षा देत Nishka Hosangady हिने मिळवले 73%

यंदाच्या बारावीच्या निकालात कोकणचा निकाल 93.23%, मुंबई 83.85%, पुणे 87.88%, औरंगाबाद 87.29%, कोल्हापूर 87.12%, नाशिक 84.77%, लातूर 86.08%, अमरावती 87.55% असा निकाल लागला. यात कोकणाने बाजी मारली असून सर्वात कमी निकाल नागपूरचा 82.05% इतका लागला.