Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशात बेरोजगारीचं (Unemployment) प्रमाण वाढत आहे. कालचं दिल्लीत (Delhi) पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींकडून (PM Modi) 75 हजार तरुणांना नोकरीचं ऑफर लेटर (Offer Letter) देण्यात आलं तरीही देशासह राज्यात बेरोजगारीचं (Unemployment) प्रमाण वाढत चाल्ल आहे. पदवी (Graduation किंवा पद्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण देखील नोकरीच्या शोधात आहेत. तरी महावितरणात मात्र एसएससी (SSC) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. तरी तुम्ही एसएससी म्हणजे वर्ग दहावीची परिक्षा उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. महावितरणा तर्फे इलेक्ट्रीशियन, वायरमन, COPA अशा विविध पदांसाठी पदभरती केल्या जाणार आहे. तरी तुम्ही या पदभरतीसाठी इच्छुक असल्यास महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करु शकता. ही अर्ज प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी २७ ऑक्टोबर पर्यतचा वेळ देण्यात आला आहे.

 

महावितरणा कडून केले जाणाऱ्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण (Education) घेतलं असणं अनिवार्य आहे. महावितरणाच्या अधिकृत वेबसीटवर नोटिफिकेशनमध्ये (Notification) संबंधित सविस्तर तपशील देण्यात आला आहे. तसेच संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे उमेदवारांना आवश्यक आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे (Resume), दहावी (SSC), आयटीआ डिप्लोमा, शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला (Cast Certificate), पासपोर्ट साईझ फोटो आणि आधारकार्ड (Aadhar Card) हे कागदपत्र सोबत जोडणे अनिवार्य आहे. (हे ही वाचा:- SBI Recruitment 2022: स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये CBO पदासाठी नोकरभरती; sbi.co.in वर असा करा अर्ज)

 

महावितरणाकडून करण्यात येणाऱ्या या पदभरतीयाठी पदानुसार वेतन देण्यात येणार आहे. तरी इलेक्ट्रीशियन (Electrician) पदाकरीता 7,600 ते 7,700 रुपये प्रतिमहिना वेतन दिल्या जाणार आहे. वायरमन (Wireman) पदासाठी  6,996 ते 7,700 रुपये प्रतिमहिना आणि COPA पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 7,600 ते 7,700 रुपये वेतन दिल्या जाणार आहे,