SBI Recruitment 2022: स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये CBO पदासाठी नोकरभरती; sbi.co.in वर असा करा अर्ज
State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. यामध्ये एसबीआय (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर्स (Circle Based Officers) पदासाठी 1400 नियमित आणि 22 बॅकलॉग व्हेकेन्सीस साठी अर्ज मागावले आहेत. इच्छुक उमेदवार एसबीआय ची अधिकृत वेबसाईट sbi.co.in किंवा ibpsonline.ibps.in वर आपला अर्ज दाखल करू शकता. एसबीआयच्या careers portal वर हा अर्ज दाखल करता येऊ शकतो. दरम्यान 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.  हे देखील नक्की वाचा: FSSAI Recruitment 2022: फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये मॅनेजर, ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; 1,77,500 रुपयांपर्यंत मिळणार पगार.

 वयोमर्यादा आणि पात्रता निकष

एसबीआय मध्ये CBO साठी वयोमर्यादा 30 सप्टेंबर पर्यंत उमेदवार किमान 21 वर्ष ते कमाल 30 वर्षाचा असावा अशी आहे. तर कोणत्याही विद्यापीठातून मान्यतापात्र पदवीधारक असावा. तसेच मेडिकल, इंजिनिअर्स, सीए, कॉस्ट अकाऊंटंट असे शिक्षण असलेले उमेदवार देखील पात्र असतील. तर अर्ज करण्यासाठी जनरल, ईडब्लूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 750 रूपये शुल्क आकारले जाईल. एससी, एसटी, पीडब्लूडी प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ असेल.

कसा कराल ऑनलाईन अर्ज?

  • एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वर 'RECRUITMENT OF CIRCLE BASED OFFICERS'लिंक ओपन करा.
  • 'Apply Online' वर क्लिक करा.
  • रजिस्टर करून तुमची अ‍ॅप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
  • फॉर्म भरून तुमचे कागदपत्र अपलोड करून शुल्क भरा.
  • आता तुम्ही फॉर्म सबमीट करू शकता. या फॉर्मची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकता.

ऑनलाईन परीक्षा, स्क्रिनिंग आणि मुलाखत फेरी यावरून उमेदवार शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत. दरम्यान subsidiaries of Scheduled Commercial Banks मध्ये काम करणारे उमेदवार या नोकरभरतीमध्ये पात्र नसतील.