Representative Image ( Photo Credits: Pixabay )

The State Common Entrance Test Cell, Maharashtra कडून आज (10 सप्टेंबर) MAH CET LLB 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली ज्जाते. दरम्यान या परीक्षेचा निकाल सीईटी सेलकडून अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर जाहीर केला जाणार आहेत. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी आपला अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख यांच्या मदतीने लॉग ईन करावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना MH CET Law scorecard पाहता येणार आहे.

यंदा MAH CET LLB 2022 परीक्षा 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन फॉर्मेटमध्ये झाली होती. काही ठिकाणी तांत्रिक दोष आल्याने सीईटी सेलने त्यांच्यासाठी 27 ऑगस्ट दिवशी पुन्हा परीक्षा घेतली. कॅप राऊंड सुरू होण्यापूर्वी काही दिवस विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्कोअरकार्ड दिले जाईल. स्टेट सीईटी सेल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एमएच सीईटी 2022 लॉ निकाल ऑल इंडिया रॅन्क लिस्ट मध्ये जाहीर केला जाणार आहे. MHT CET 2022 Result: सीईटी निकालामध्ये Percentile Score कसा कॅलक्युलेट केला जातो?

MAH CET LLB 2022 निकाल कसा पहाल?

  • cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेज वर जाहीर झालेल्या निकालांची यादी दिसेल त्यामध्ये MAH LLB CET 2022 scorecard link वर क्लिक करा.
  • आता तुम्हांला आवश्यक माहिती ज्यामध्ये अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख द्यावी लागेल.
  • आता तुमच्या स्क्रिनवर MH CET Law scorecard दिसेल.
  • हा निकाल पीडीएफ मध्ये असेल आणि तो डाऊनलोड करता येईल.

Maharashtra State CET Cell कडून घेतल्या जाणार्‍या MAH CET Law entrance exam या कायद्याचं शिक्षण देणार्‍या 3 आणि 5 वर्षांच्या कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आहेत. या परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना सरकारी, गैरसरकारी कॉलेज मध्ये प्रवेश दिले जातात.