MHT CET 2022 Result: सीईटी निकालामध्ये Percentile Score कसा कॅलक्युलेट केला जातो?
online ((Photo Credits: Pexels)

MHT CET 2022 ची आन्सर की जारी झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. सीईटी सेलकडून जारी परिपत्रकानुसार, यंदा पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) ग्रुपचा निकाल 15 सप्टेंबर पर्यंत जारी केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी 4 सप्टेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला होता.

MHT CET cell कडून यंदा MHT CET निकाल हा मल्टी शिफ्ट पेपर्स मधील गुणांच्या आधारे नॉर्मलायझेशन प्रोसेस द्वारा जारी केला जाणार आहे. MHT CET चे पर्सेंटाईल स्कोअर हे परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांच्या सापेक्ष कामगिरीवर आधारित गुण आहेत. प्राप्त झालेले MHT CET गुण परीक्षार्थींच्या प्रत्येक सत्रासाठी 100 ते 0 पर्यंतच्या स्केलमध्ये बदलले जातात. इथे पहा सविस्तर नोटीस.

MHT CET percentile calculator

सर्वोच्च आणि सर्वात कमी गुणांच्या दरम्यान उमेदवारांनी मिळवलेले MHT CET गुण देखील योग्य टक्केवारीत रूपांतरित केले जातात. MHT CET Result 2022 Date: एमएचटी सीईटी  PCM, PCB चा निकाल 15 सप्टेंबरला कुठे, कसा पहाल? 

एमएचटी सीईटी परीक्षा 2022 फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स ची परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान घेतली आहे. पुर्नपरीक्षा काही विद्यार्थ्यांसाठी 29 ऑगस्ट दिवशी घेण्यात आली होती.