Image Used For Representational Purpose| Photo Credits: Pixabay.com

FYJC Admission 2020: महाराष्ट्रात इयत्ता दहावीचा निकाल (SSC Results) लागल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा आणि महत्वाचा अर्ज भरण्याचा टप्पा आजपासून सुरु होत आहे. आजपासून प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करुन 11वी प्रवेशासाठी अर्ज (भाग-1) भरायचा आहे. यात तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल. अर्ज भरून झाल्यावर आज अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरून अर्ज लॉक करायचा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा अर्ज भरून झाल्यावर काहीच दिवसात अर्जाचा पार्ट 2 म्हणजेच दहावीच्या गुणांनुसार कॉलेज निवडीचा प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. यानंतर कॉलेजेस कडून मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल व त्यानुसार अकरावीचे ऍडमिशन पूर्ण होतील. तूर्तास हा फॉर्म कुठे आणि कसा भरायचा याबाबत जाणून घ्या. Maharashtra Board SSC Result 2020: महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल 95.30 %

तत्पूर्वी फॉर्म भरताना तसेच या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत हे आपण पाहुयात. त्यासाठी इथे क्लिक करा.

FYJC Admission 2020 How To Fill Form?

-कॉलेजचा प्राधान्यक्रम ठरवणार फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी mumbai.11thadmission.org.in. या अधिकृत संकेतस्थळावर जा

- होम पेज वर लॉग इन आयडी व पासवर्ड भरायचा आहे. यापूर्वी आपल्याला शाळेतून लॉग इन आयडी बनवून दिला असेल तो न चुकता भरा.

- खाली CAPTCHA कोड विचारला जाईल तो सुद्धा भरा.

- तुम्हाला फॉर्म दिसेल, त्यात सर्व रकाने योग्य माहितीनुसार भरा.

- फॉर्म शुल्क भरण्यास सांगितले जाईल.

-फॉर्म लॉक करा.

पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबादसह मुंबई एमएमआरमध्ये अकरावी प्रवेश 2020 (वर्ग 11 प्रवेश) साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 26 जुलै रोजी सुरू झाली आहे.