प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

दहावी महाराष्ट्र बोर्डाचे (Maharashtra SSC Board) निकाल जाहीर झाले आणि सर्वत्र झधावपळ सुरु झाली ती ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची. ऑनलाईन फॉर्म (Online Form) भरताना दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात बरीच धाकधूक असते. तसेच ऑनलाईन प्रक्रियेत इंटरनेटची समस्या उद्भवणार यामुळे विद्यार्थ्यांना भीती वाटते. अशा वेळी फॉर्म भरताना अनेकदा त्यांची धांदल उडते आणि आवश्यक ती कागदपत्रे आपण विसरतो. म्हणूनच अशा विद्यार्थ्यांची द्विधा मन:स्थिती कमी करण्यासाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज असते याची माहिती आज आम्ही देणार आहोत.

सर्वात महत्त्वाचे म्हणेज सर्वे कागदपत्रे स्कॅन करुन घ्यावीत त्यामुळे आपल्याकडे सर्व डेटा राहतो तसेच कागदपत्रे गहाळ झाल्यास या स्कॅनिंग पुराव्याची मदत होते.

हेदेखील वाचा- Maharashtra Board SSC Result 2020 Declared: 10वी च्या विद्यार्थ्यांना Rechecking, Photocopy साठी verification.mh-ssc.ac.in वर 30 जुलैपासून करता येणार अर्ज

पाहूयात अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे:

1. दहावीची मूळ गुणपत्रक (Result)

2. शाळा सोडल्याचा दाखला

3. जात प्रमाणपत्र

4. उत्पन्नाचा दाखला

5. विशेष आरक्षण असल्यास त्याचे प्रमाणपत्र

6. जन्म दाखला (Birth Certificate)

7. रेशनकार्ड

8. वीज बिल

9. फोटोसहित ओळखपत्र (ओळखपत्र)

10. तुमचे पासपोर्ट साइज फोटोज

ही सर्व मूळ कागदपत्रे स्कॅनही करावीत. जेणेकरून त्याचा एक डेटा सेव्ह राहतो. अकरावी हा तुमच्या विद्यालयातून महाविद्यालयात जाण्याचा पहिला चप्पा अशतो. त्यामुळे सर्व ऑनलाईन प्रक्रिया नीट पार पडते की नाही या गोष्टीची काळजी घ्या.