Maharashtra Board SSC Result 2020 Declared: 10वी च्या विद्यार्थ्यांना Rechecking, Photocopy साठी  verification.mh-ssc.ac.in  वर 30 जुलैपासून करता येणार अर्ज
Results| Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्र राज्यात 10 वीच्या विद्यार्थ्यांना असलेली एसएससी निकालाची प्रतिक्षा आता संपली आहे. आज बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी 95.30% इतकी आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. दरम्यान एखादा विद्यार्थी त्यांच्या मार्क्सबद्दल समाधानी नसेल तर विद्यार्थ्यांना, पालकांना श्रेणी विषय वगळता इतर विषयांच्या गुणांची पडताळणी, पुर्नमुल्यांकन, उत्तर पत्रिकांची छायाप्रत मिळवण्यासाठी verification.mh-ssc.ac.in वर खास सोय करण्यात आली आहे. ऑनलाईन माध्यमातून त्यासाठी अर्ज करण्याची सोय शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. Maharashtra Board SSC Result 2020: महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल 95.30 %; इथे पहा संपूर्ण निकाल. 

शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आता निकालाच्या दुसर्‍या दिवसापासून म्हणजे 30 जुलै पासून विद्यार्थ्यांना verification.mh-ssc.ac.in वर अर्ज करता येईल. दरम्यान गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत तर छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातूनच स्थलांतर प्रमाणपत्र देखील दिले जाईल. डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, युपीआय, नेट बॅकिंगच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना यासाठी शुल्क भरता येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान राज्यात दहावीची परीक्षा पार पडली आहे. यामध्ये कोरोना जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर भूगोल विषयाचा पेपर रद्द करून त्याचे सरासरी गुण देऊन यंदा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबर महिन्यात वर्ग सुरू करण्याचा शिक्षण मंडळाचा मानस आहे.