Maharashtra Board SSC Result 2020: महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल 95.30 %; 1 वाजता पाहू शकाल  mahresults.nic.in वर गुण
SSC Result 2020| File Image

Maharashtra Board SSC Results 2020:  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Class 10 Result)  जाहीर झाला आहे. यंदा हा निकाल  95.30 % लागला आहे. यावर्षीदेखील बोर्डाच्या निकालामध्ये मुलींचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. तर 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने (Konkan Division) बाजी मारली आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्र शिक्षण राज्य मंडळाने केवळ निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर निकाल दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. कोकणाचा सर्वाधिक निकाल 98.77% आहे तर औरंगाबदचा निकाल सर्वात कमी म्हणजे 93% लागला आहे.  20 विषयांचा निकाल 100% लागला आहे. मार्च 2019 च्या तुलनेत यंदा 18.20 % निकाल अधिक लागला आहे.  Maharashtra Board Exam Results 2020: 10वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

विभागनिहाय बोर्डाचा संपूर्ण निकाल 

कोकण – 98.77 टक्के

पुणे – 97.34 टक्के

कोल्हापूर – 97.64 टक्के

मुंबई – 96.72 टक्के

अमरावती – 95.14 टक्के

नागपूर – 93.84 टक्के

नाशिक – 93.73 टक्के

लातूर – 93.09 टक्के

औरंगाबाद – 92 टक्के

10 वी चा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • mahresults.nic.in / अन्य अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
  • त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट यावर क्लिक करा.
  • रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून सबमीट करा
  • Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 तुम्हांला स्क्रिन वर दिसू शकेल.

महाराष्ट्रामध्ये यंदा 10वीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च अशी नियोजित होती. महाराष्ट्रात 9 विभागीय मंडळांमध्ये 10वीची परीक्षा होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेला 17 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.  दरम्यान 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के लागले .