महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Class 10 Result) जाहीर झाला असून mahresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला गुण तपासून पाहता येणार आहेत. यंदा दहावीचा निकाल 95.30 % लागला आहे. 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने (Konkan Division) 98.77 टक्के निकालासह बाजी मारली आहे, तर औरंगाबदचा निकाल सर्वात कमी म्हणजे 93% लागला आहे. महाराष्ट्रामध्ये यंदा 10वीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च अशी नियोजित होती. दहावीच्या परीक्षेला 17 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के लागले आहेत. निकाल जाहीर झाल्यावर सर्व विद्यार्थी एकत्र लॉग इन करत असल्यास साईट क्रश होण्याची शक्यता असते. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी नेमक्या कोणत्या वेबसाईटवर आणि कशाप्रकारे निकाल पाहाल हे जाणून घेऊयात. विभागनिहाय बोर्डाचा संपूर्ण निकाल
10 वी चा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
-mahresults.nic.in / अन्य अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
-त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट यावर क्लिक करा.
-रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून सबमीट करा
-Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 तुम्हांला स्क्रिन वर दिसू शकेल.
10 वी चा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स
-mahresults.nic.in
- maharashtraeducation.com
- results.mkcl.org
- mahahsscboard.maharashtra.gov.in
- mahahsscboard.in
यंदा कोरोना व्हायरस संकट काळात महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द झाला आहे. यंदा इतर विषयामध्ये मिळालेल्या मार्कांच्या सरासरीने भूगोल विषयाचे मार्क दिले जातील. त्यानुसार विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल लावला जाणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये लेखी व अंतर्गत मूल्यमापन/ तोंडी/ प्रकल्प/ प्रात्याक्षिक/ चाचणी मिळून किमान 35% मार्क्स मिळवणं गरजेचे आहे.
यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे लेटेस्टली कडून खूप खूप अभिनंदन!