MSBSHSE 10th Result 2020 | File Image

MSBSHSE 10th Result 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10 वी चा निकाल आज जाहीर झाला असून यंदा 95.30% निकाल लागला आहे. दुपारी 1 वाजता mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक वर्गामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु, आता ही उत्सुकता फार काळ ताणून धरावी लागणार नाही. निकाल जाहीर झाला असून दुपारी 1 वाजता तुमचे गुण तुम्हाला शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येतील. तसंच निकालासंबंधित अधिक जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला भेट द्या. येथे क्लिक करुन तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालासंबंधित सर्व माहिती मिळवू शकता.

10 वीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर क्लिक करा.

# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

इतर संकेतस्थळं:

# mahresults.nic.in

# maharashtraeducation.com

# results.mkcl.org

# mahahsscboard.maharashtra.gov.in

# mahahsscboard.in

या संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये यंदा 10वीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना व्हायरस संकटामुळे दहावीचा भुगोलाचा पेपर होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण दिले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे.