Maharashtra Board HSC, SSC Results 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाचे वेध लागले आहे. बोर्ड परीक्षेच्या निकालावर अनेक विद्यार्थ्यांचे भविष्यातील प्लॅन्स अवलंबून असल्याने या निकालाच्या तारखांकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बोर्ड परीक्षेचा निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईट वर जाहीर केला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. या निकालाच्या तारखा अद्याप बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
दहावी, बारावीच्या निकालाबाबत अनेकदा खोट्या बातम्या अफवा सोशल मीडीयात झपाट्याने वायरल होतात त्यामुळे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाल्याशिवाय निकालाच्या तारखांवर विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख आता पर्यंत प्रत्यक्ष निकालाच्या केवळ एक दिवस आधीच जाहीर केली जाते. त्यामुळे याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जागृत राहणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना पाहताना तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव ही माहिती देणं आवश्यक आहे. निकाल ऑनलाईन पाहताना विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत. नक्की वाचा: MHT CET 2024 Revised Exam Dates: एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग सह अन्य कोर्सच्या सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल .
कसा पहाल महाराष्ट्र बोर्डाचा 10वी, 12वी चा निकाल?
- mahresult.nic.in ही किंवा वर दिल्यापैकी बोर्डाची कोणतीही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
- त्यानंतर HSC/SSC Examination Result वर क्लिक करा
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करा.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
महाराष्ट्र बोर्ड प्रमाणेच आयसीएससी आणि सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अॅडमिशनची पुढील प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे त्याच सुमारास अन्य दोन्ही बोर्डांचे निकाल लागण्याची शक्यता आहे.