Representational Image | Pixabay

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान झाली आहे. आता या 12वी परीक्षेचा निकाल (Maharashtra Board HSC Result) येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. बोर्डाकडून काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केली जाणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सार्‍या विषयांमध्ये किमान 35% गुण आवश्यक आहेत.

बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यापैकी 8 लाख 10 हजार 348 विद्यार्थी (मुले) आणि 6 लाख 94 हजार 652 विद्यार्थी (मुली) तसेच 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थी होते. नक्की वाचा: How To Check HSC Result 2025 On SMS: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल SMS च्या माध्यमातून कसा पहाल? 

जाणून घ्या निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

  • mahresult.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • 'HSC Examination Result 2025' या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा बारावीचा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव एंटर करा.
  • तुमचे गुण पाहण्यासाठी 'GET RESULT' वर क्लिक करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.

DigiLocker कसा पहाल यंदा MSBSHSE HSC निकाल?

    • digilocker.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा Digilocker app ओपन करा.
    • डिजिलॉकर वर तुमचं अकाऊंट असेल तर साईन इन करा. पहिल्यांदाच अ‍ॅप वापरत असाल तर नव्या अकाऊंट साठी साईन अप करा.
    • बोर्डाच्या उपलब्ध लिस्ट मधून Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education म्हणजेच MSBSHSE ची निवड करा.
    • HSC Results चा पर्याय निवडा.
    • रोल नंबर सह तुम्हाला विचारले जाणारे तपशील टाका.
    • आता तुमचा निकाल स्क्रिनवर पाहता येईल. निकालाची प्रिंट किंवा कॉपी सेव्ह देखील करून ठेवता येईल.

    निकाल जाहीर झाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यांच्या आत मूळ बारावीची गुणपत्रिका संबंधित शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी अधिकृत पोर्टलवरून त्यांची ई-मार्कशीट आणि उत्तीर्णता प्रमाणपत्र देखील डाउनलोड करता येऊ शकते.