LIC | (File Image)

भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ जे एलआयसी (LIC) म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(Life Insurance Corporation Of India) नावाने प्रचलीत आहे. हे महामंडळ सहाय्यक प्रशासकीय पदांसाठी (LIC AAO Recruitment 2023) नोकर भर्ती करत आहे. त्यामुळे एलआयसी मध्ये नोकरी करण्याचा आपण विचार करत असाल तर आपल्यासाठी नामी संधी चालून आली आहे. फक्त त्यासाठी वय, शिक्षण आणि आवश्यक पात्रता आपल्याकडे असायला हवी. त्यामुळे जाणून घ्या एलआयसीमध्ये होत असलेल्या विविध पदांच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि इतर सर्व बाबी.

पदसंख्या आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख: एलआयसी मध्ये एकूण 300 जागांसाठी भरती होत आहे. इच्छुक उमेदवार LIC AAO भर्ती 2023 साठी अधिकृत वेबसाइट- licindia.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 आहे. (हेही वाचा, LIC Home Loan: आता घर खरेदी करणं होणार महाग; कंपनीने वाढवले हाऊसिंग फायनान्सचे दर)

एलआयसी भर्ती प्रक्रिया कशी असेल?: सहाय्यक प्रशासकीय अधिकार्‍यांची निवड ही त्रिस्तरीय प्रक्रिया आणि त्यानंतरच्या भरतीपूर्व वैद्यकीय तपासणीवर आधारित असेल. त्यासाठी प्राथमिक परीक्षा 17 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

भर्ती, पात्रता आणि निकष: उमेदवाराने मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. LIC AAO भर्ती 2023 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 21 वर्षे ते 30 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.

वेतन: LIC AAO भर्ती 2023 परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रति महिना 53600 रुपये मूळ वेतन आणि इतर फायदे मिळतील. अधिक तपशीलांसाठी, उमेदवारांना licindia. inया अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी असे एलआयसीने म्हटले आहे.