JEE Main Admit Card 2021: जेईई मेन मार्च सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आलं आहे. परीक्षा चाचणी एजन्सी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने आज या सत्रासाठी प्रवेशपत्रे जारी केली आहेत. जे उमेदवार या परीक्षेस बसणार आहेत ते अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. मार्च सत्राची परीक्षा 15 मार्च, 16, 17 आणि 18, 2021 रोजी देशभरात घेण्यात येणार आहे. कोविड- 19 साथीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर परीक्षा सुरू होण्याच्या तीन तासापूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षास्थळी पोहोचावे लागेल.
JEE Main Admit Card 2021: प्रवेश पत्र डाउनलोड कसे करावे?
जेईई मुख्य मार्च सत्र परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा. यानंतर, होमपेजवर उपलब्ध अॅडमिट कार्ड नोटिफिकेशनवर क्लिक करा. यानंतर ते लॉगिन पृष्ठावर रीडायरेक्ट होईल. यानंतर, आपला अर्ज क्रमांक, जन्म तारीख, सुरक्षा पिन प्रविष्ट करा आणि सबमिट क्लिक करा. आपले प्रवेश पत्र स्क्रीनवर प्रदर्शित केले जाईल. त्यानंतर तुम्ही आपले प्रवेश पत्र डाउनलोड आणि प्रिंट करू शकता. (वाचा - MPSC Exams: एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थी आक्रमक, पुणे येथे आंदोलन)
उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात घ्याव्या -
उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर आपले नाव, आपल्या वडिलांचे / पालकांचे नाव आदी वैयक्तिक तपशील तपासला पाहिजे. ही सर्व माहिती बरोबर असणे आवश्यक आहे. एजन्सीने परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये मोठ्या बटनाचे कपडे आणि जाड तळाचे शूज न घालण्याची सूचना केली आहे.
या व्यतिरिक्त, परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी फेस मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. तसेच उमेदवारांनी सॅनिटायझरचा वापर करावा. उमेदवार व इतर कर्मचार्यांसाठी परीक्षा केंद्रातील हँड सॅनिटायझर्स उपलब्ध असतील.