ISRO (Image: PTI)

Sarkari Naukari: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण इस्रो (ISRO) मध्ये नोकरिची संधी उपलब्ध झाली असून रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार टेक्निशियन, ड्राफ्टमॅन, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टेंट, लायब्रेरी असिस्टंट, हिंदी टाइपिस्ट, कॅटरिंग अटेंडट, कुक, फायरमॅनसह अन्य विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी इस्रोची अधिकृत वेबसाईट isro.gov.in येथे भेट द्यावी. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 ठेवण्यात आली आहे.

इस्रोकडून 15 फेब्रुवारीला नोकर भरतीबाबत जाहिरात झळवकण्यात आली आहे. जाहिरात केलेल्या पदांसाठी नेमणुका तात्पुरत्या असतील, जे अनिश्चित काळासाठी सुरू राहण्याची शक्यता आहे. तर जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

रिक्त पदांसाठी नोकर भरती-

-टेक्निशियन बी (विभिन्न ट्रेडस)- 102 पद

-ड्राफ्ट्समॅन बी- 03 पद

-टेक्निकल असिस्टंट (विभिन्न ट्रेडर्स)- 41

- पद लाइब्रेरी असिस्टंट – 04 पद

-सायंटिफिक असिस्टंट – 07 पद

- हिंदी टाइपिस्ट – 02 पद

-कॅटरिंग अटेंडेट – 05 पद

-कुक – 5 पद

-फायरमॅन – 4 पद

-लाइट व्हीइकल ड्रायव्हर – 4 पद

-हेवी व्हीइकल ड्रायव्हर – 5 पद

वरील पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची त्यांचे शिक्षण, अनुभव आणि योग्यतेनुसार निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इस्रोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज प्रक्रिया 15 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने त्याची संपूर्ण माहिती देणे अत्यावश्यक आहे. तसेच अर्जाची फी 250 रुपये असून ती तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरु शकता.