Indian Navy Recruitment: भारतीय नौसेनत सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण नेवी सेल भरतीच्या तयारीसाठी इंडियन नेवी द्वारे मॅट्रिक रिक्रुट इंट्री अंतर्गत सेलरच्या 300 पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रियेला आता सुरुवात झाली असून पुढील पाच दिवसात त्याची अंतिम तारीख (2 नोव्हेंबर) असणार आहे. भारतीय नौसेनेने एप्रिल 2022 पासून सुरु होणाऱ्या एमआर सेलर बॅचच्या इंट्रीसाठी अधिसुचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.(7th Pay Commission: निवृत्तीवेतनधारकांना गूडन्यूज; सरकारने जारी केली 31% DR ची ऑर्डर)
अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी इंडियन नेवी सेलर-मॅट्रिक रिक्रुटसाठी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in येथे भेट द्यावी. त्यानंतर लेटेस्ट अपडेट सेक्शनमध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हा नव्या पानावर New Registration वर क्लिक करत लॉग इन करावे लागेल. त्यानंतरच तुम्हाला नोकर भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.(नोकरदार वर्गासाठी सरकारकडून दिवाळी गिफ्ट, 6 कोटी लोकांच्या PF खात्यात थेट रक्कम होणार ट्रान्सफर)
तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही नियम आणि अटी लागू असणार आहेत. त्यानुसार सेलर-एमआर एप्रिल 2022 च्या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावे. त्याचसोबत उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2002 च्या आणि 31 मार्च 2005 च्या नंतर झालेल नसावा.