Image For Representations (Photo Credits: Twitter/File)

केंद्र सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचार्‍यांच्या महागाई भत्ता (DA) मध्ये वाढ करून गोड बातमी दिली आहे. याचवेळी केंद्रीय कर्मचार्‍यांसोबत निवृत्त पेन्शनधारकांनाही DR वाढीचं गिफ्ट दिलं होतं. आता अखेर 27 ऑक्टोबरला या डीआर वाढीचं Office Memorandum जारी करण्यात आलं आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 28% वरून 31% अशी 3 % वाढ करण्यात आली आहे. 1 जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे. येत्या पगारात मागील 3 महिन्यांची थकित देखील दिली जाणार आहे.

पेंशनधारकांना त्यांना मिळत असलेल्या बेसिक पेन्शनच्या 31% डीआर दिला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार पेंशन असणार्‍यांना आणि त्याच्या कुटुंबीयांना असलेल्या पेन्शनधारकांनाही याचा फायदा मिळणार आहे. सध्या 28% असलेला डीआर आता 31% करण्याला राष्ट्रपतींना आनंद होत आहे असे देखील Office Memorandum मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

निवृत्त केंद्रीय कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, लष्करातील निवृत्त वेतनधारक आणि कुटुंबीय, सिव्हिलियन पेंशनधारक आणि कुटुंब, ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर आणि कुटुंब, रेल्वेतील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब यांना आता सातव्या वेतनआयोगानुसार 31% डीआर मिळणार आहे. 7th Pay Commission: महागाई भत्तामध्ये 3% वाढ; पहा प्रति महिना, वर्षाला किती होणार पगारवाढ इथे घ्या जाणून .

कोरोना संकटकाळात भारत सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए गोठवला होता मात्र आता तो पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. डीए, डीआर मधील वाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 9488.70 कोटीचा भार पडणार आहे. यामध्ये 47.14 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा मिळणार आहे.