Money | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

दिवाळीच्या तोंडावर यंदा महागाई भत्ताच्या वाढीच्या (DA Hike) प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. आजच्या निर्णयानुसार, आता केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 28% वरून 31% करण्यात आला आहे. हा वाढीव महागाई भत्ता 31 जुलै 2021 पासून लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. मग तुमचा पगार कसा आणि किती वाढणार हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की पहा.

सातव्या वेतन आयोगानुसार, पगार असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांच्या बेसिकच्या 31% आता महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे महिन्याला त्यांच्या पगारामध्ये अंदाजे 6750 रूपये पगारवाढ अपेक्षित आहे. तर वर्षाला 6480 ते 81 हजारापर्यंत पगारवाढ होऊ शकते. 7th Pay Commission: केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन धारकंना आता SMS, WhatsApp द्वारा मिळू शकणार Monthly Pension Slip.

डीए, डीआर मध्ये 3% वाढ

ज्या केंद्रीय कर्मचार्‍याचा सातव्या वेतन आयोगानुसार 18 हजर बेसिक आहे त्याला 540 रूपये पगारवाढ मिळणार आहे. त्यामुळे वर्षाला 6480 रूपये पगारवाढ अपेक्षित आहे. तर 2,25,000 बेसिक असलेल्यांना प्रतिमहिना 6750 वाढ महिन्याला म्हणजे 81,000 रूपये वर्षाला पगारवाढ मिळणार आहे.

31% डीए वाढ नुसार कशी असेल पगारवाढ?

18 हजार बेसिक असलेल्यांसाठी

सध्याचा महागाई भत्ता (28%) - 5040 प्रतिमहिना

नवा महागाई भत्ता (31%) - 5580 प्रतिमहिना

फरक - 5580-5040 = 540 प्रतिमहिना

वार्षिक वाढ - 540 X 12 = 6480

2,25,000 बेसिक असलेल्यांसाठी

सध्याचा महागाई भत्ता (28%) - 63,000 प्रतिमहिना

नवा महागाई भत्ता (31%) - 69,750 प्रतिमहिना

फरक - 69750-63000 = 6750 प्रतिमहिना

वार्षिक वाढ - 6750 X 12 = 81,000

केंद्रीय कर्मचार्‍यांसोबतच निवृत्त पेन्शनधारकांनाही 1 जुलै 2021 पासून 31% डीआर लागू होणार आहे. या वाढीव डीआर,डीए मुळे सरकारी तिजोरीवर 9488.70 कोटी वर्षाला भार पडणार आहे. याचा फायदा 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख निवृत्ती पेन्शनधारकांना होणार आहे.