Indian Navy MR Recruitment 2021: भारतीय नौसेना मध्ये सेलरमध्ये 300 हून अधिक पदांसाठी नोकर भरती, 23 जुलै पर्यंत करता येईल अर्ज
Representational Image (Photo Credits: File Photo)

Indian Navy MR Recruitment 2021: भारतीय नौसेनेत सेलर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 350 पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी नौसेनेच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै आहे. या नोकर भरतीअंतर्गत एकूण 350 हून अधिक पदांवर उमेदवार निवडले जाणार आहेत. जवळजवळ 170 उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारिरीक आरोग्य चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. लेखी परक्षेला बसण्यासाठी कट ऑफ गुण हे विविध राज्यांसाठी वेगळे असू शकतात.

सेलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून शिक्षण बोर्डातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावे. तर उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान असावे. उमेदवारांची निवड परीक्षा आणि पीएफटी माध्यमातून होणार आहे. लेखी परीक्षा आणि पीएफटीसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट योग्यता परीक्षेच्या टक्क्यांच्या गुणवारीनुसार केली जाणार आहे. कट ऑफ गुण एका राज्यापेक्षा दुसऱ्या राज्यात वेगळे असू शकतात.(दिलासादायक! आयटी कंपनी Infosys देणार तब्बल 35,000 फ्रेशर्सना नोकऱ्या; Q1 मध्ये झाला 5195 कोटींचा नफा)

पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावरांना प्रशिक्षण काळादरम्यान 14,600 रुपये स्टायपेंड दिले जाणार आहे. तर ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना डिफेंस पे मॅट्रिक्सच्या पे लेव्हल 3 वर ठेवले जाणार आहे. या व्यतिरिक्त त्यांना 5200 रुपये प्रति महिना डीए दिला जाणार आहे. या परीक्षेसंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.