प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Indian Army Recruitment 2021: भारतीय सेनेने एसएससी (टेक्निकल) 58 वा कोर्स पुरुष आणि 29 वा कोर्स महिला एन्ट्रीसाठी एक संक्षिप्त अधिसूचना जाहीर करत अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 सप्टेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in येथे भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोंबर 2021 आहे.

भरतीसाठी नोटिफिकेशन लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहे. रिक्त जागा, परिक्षेची तारीख यासह निवड प्रक्रियेबद्दल ही त्यामध्ये अधिक माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.(NCRTC Recruitment 2021: नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये 226 पदासांठी भरती प्रक्रिया सुरू, 'असा' करा अर्ज)

या व्यतिरिक्त भारतीय सेनेने लॉ ग्रॅज्युएट पुरुष आणि महिला उमेदवारांना जेएजी भरती 28 व्या पाठ्यक्रमासाठी एक शॉर्ट नोटिस जाहीर केली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास त्यांनी 29 सप्टेंबर पासून करता येईल.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मोठे अपेडट, 'या' महिन्यात मिळू शकते खुशखबर) 

ज्या उमेदवारांना जेएजी 2021 कोर्ससाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कायद्यासंबंधित डिग्री घेतलेली असावी. योग्यता संबंधित निवड प्रक्रियेसाठी वय, अनुभव आणि वेतन आणि अर्ज प्रक्रियेची अधिक माहिती नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर कळणार आहे.