7TH CPC Latest News: सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. त्याचसोबत केंद्रीय सरकार कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी लवकरच खुशखबर जाहीर करणार आहे. अशातच आता केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि पेन्शन धारकांच्या डीएमध्ये वाढ करणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या डीए, डीआर दोन्ही 3 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यानंतर महागाई भत्ता आणि डीआर 31 टक्के होणार आहे. डीएनएच्या रिपोर्ट्सनुसार, कर्मचारी संघाच्या वाढत्या मागणीदरम्यान, सरकार जुलै 2021 च्या डीए, डीआरची घोषणा सप्टेंबर मध्ये करु शकते.परंतु मोदी सरकारने यासाठी अद्याप वेळ निर्धारित केलेली नाही. सरकार सप्टेंबर मध्ये डीएमध्ये वाढीची घोषणा करत ऑक्टोंबर मध्ये याच्या पेमेंटचा विचार करत आहे.
कर्मचारी संघाच्या मते सरकार 3 टक्क्यांनी डीए मध्ये वाढ करु शकते. एसआयसीपीआय (AICPI) च्या आकडेवारीनुसार जून 2021 चा इंडेक्स 1.1 गुणांनी वाढून 121.7 वर पोहचला आहे. अशातच जून 2021 मध्ये महागाई भत्ता आणि डीआर मध्ये 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. कर्मचारी संघाचे असे म्हणणे आहे की, जर महागाई भत्त्यात वाढ झाल्यास सरकारने जुलै पासून ते आतापर्यंतचे पेमेंट्स केले पाहिजे. कारण दीड वर्षात एरियर बद्दल काहीच बोलले गेले नाही.(PAN-Aadhaar Link करण्याच्या मुदतीत 6 महिन्यांनी वाढ; पहा काय आहे अंतिम तारीख)
खरं तर, कोरोनामुळे उद्भवलेली आर्थिक परिस्थिती पाहता सरकारने डीए आणि डीआरला फ्रीज दिला होता. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए (महागाई भत्ता), जो जुलैपूर्वी 17 टक्के होता, तो वाढल्यानंतर आता 28 टक्के झाला आहे. डीआर (डिअरनेस रिलीफ) मध्येही अशीच वाढ झाली आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता (एचआरए) देखील 24% वरून 27% पर्यंत वाढले आहे.