Exam | File Image

Institute of Company Secretaries of India कडून ICSI CS June 2025 परीक्षेचं वेळापत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये CS Executive आणि CS Professional examinations चा समावेश आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचं वेळापत्रक ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu वर पाहता येणार आहे. दरम्यान या परीक्षा ऑफलाईन मोड मध्ये घेतल्या जाणार आहेत. नक्की वाचा: UPSC Exam Calendar 2025 Revised: पहा यंदाच्या यूपीएससी च्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा ते भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा कधी? 

ICSI CS June 2025 Registration आणि अर्ज कसा कराल?

icsi.edu या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

होमपेज वर online services वर जाऊन CS 2024 registration च्या लिंकवर क्लिक करा.

पुढे “Proceed” वर क्लिक करा.

तुमची सारी माहिती नीट भरा.

फॉर्मचा प्रिव्ह्यू पाहून तो सबमीट करा. आता अ‍ॅप्लिकेशन फी भरा.

आता तुमचा फॉर्म डाऊनलोड करा.

परीक्षेसाठी अ‍ॅप्लिकेशन फी काय असणार?

Module 1 (CS Executive)साठी 1200 रूपये फी आहे तर Module 2 (CS Executive) साठी 1200 रूपये फी आहे. दोन्ही मॉड्यूल्सचे 2400 रूपये मोजावे लागणार आहेत.

एकच मॉड्यूल परीक्षेचे इच्छुक अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. CS जून 2025 नोंदणीसाठी 26 फेब्रुवारी 2025 पासून नोंदणी सुरू होईल. यावेळी, प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी उमेदवारांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये 9-9.15 हा 15 मिनिटांचा काळ असेल.