
UPSC कडून त्यांच्या 2025 च्या वेळापत्रकामध्ये बदल जाहीर केले आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा 2025 साठी अर्ज हे 22 जानेवारी 2025 पासून करता येणार आहेत. तर हे अर्ज 11 फेब्रुवारी पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. एनडीए आणि नौदल अकादमीची नोटिफिकेशन देखील 11 डिसेंबरला येणार आहे. भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत असणार आहे. तर परीक्षा 13 एप्रिल 2025 दिवशी आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहेत. भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा 25 मे 2025 दिवशी आयोजित करण्यात आली आहे. शिवाय भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2025 ही 16 नोव्हेंबर 2025 दिवशी होणार आहे.
देशात नागरी सेवा परीक्षा 22 ऑहस्ट 2025 ला तर सीडीएस परीक्षा दुसर्या टप्प्यात 28 मे 2025 ला होणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया 17 जून 2025 पर्यंत सुरू राहील. लेखी परीक्षा 24 सप्टेंबर 2025 ला होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग 22 जानेवारी 2025 रोजी CSE परीक्षेसाठी UPSC 2024 अधिसूचना जारी करेल. UPSC प्रिलिम्स उत्तीर्ण झालेले उमेदवार 22 ऑगस्ट 2025 रोजी 5 दिवसांसाठी मुख्य परीक्षेला जातील. यात 9 descriptive papers समाविष्ट आहेत आणि अंतिम गुणवत्ता यादी आणि रँकिंगसाठी महत्त्वपूर्ण आहेत.