ICSE 10th Results 2022 Declared: आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; cisce.org ते SMS द्वारा असे पहा गुण
Representational Image (Photo Credits: File Photo)

ICSE बोर्डाचा 10वीचा निकाल आज (17 जुलै) प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदा कोविड 19 च्या संकटाखाली विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यामुळे ती दोन सेमिस्टर मध्ये झाली आहे. आज या दोन्ही सेमिस्टरचा मिळून एकत्र निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण cisce.orgresults.cisce.org. या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहेत. दरम्यान दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना 33% गुण आवश्यक आहेत. यंदा 231,063 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. ICSE बोर्डाचा 10वीचा निकाल 99.97% लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. आयसीएसई निकालांमध्ये 99.98% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 99.97% मुलं उत्तीर्ण झाली आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांचा दहावीचा निकाल ऑनलाईन सोबतच उमेंग अ‍ॅप, डिजी लॉकर आणि एसएमएस च्या माध्यमातूनही पाहता येणार आहे. या निकालामध्ये सेमिस्टर 1,2 चे मार्क्स, प्रिजेक्ट्स, अंतर्गत मूल्यमापन यांचे गुण देखील अंतिम निकालामध्ये समाविष्ट केले  आहेत. या निकालावर खूष नसणार्‍यांसाठी रिचेकिंगची प्रक्रिया 17 जुलै ते 23 जुलै दरम्यान सुरू ठेवली जाणार आहे.

कसा पहाल  ICSE/दहावीचा निकाल?

  • CISCE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वर रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
  • ICSE or ISC यापैकी दहावीचा निकाल पाहण्यासाठी ICSE निवडा.
  • आता तुमचा UID, Index number, आणि Captcha टाका.
  • तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
  • आता निकालाची प्रिंटआऊट काढा

ICSE चा निकाल SMS द्वारा कसा पहाल?

दरम्यान एसएमएस च्या माध्यमातून दहावीचा निकाल हवा असल्यास मोबाईल मध्ये मेसेज मध्ये ICSE आणि सात अंकी युनिक आयडी लिहून 0924808288 वर मेसेज पाठवा. तुम्हांला एसएमएस द्वाराही निकाल पाहता येईल.

(नक्की वाचा: CBSE Term 2 Result 2022: सीबीएसई बोर्डाने लॉन्च केले Pariksha Sangam Portal; बोर्ड परीक्षा अपडेट्सबाबत मिळणार सारी माहिती एकाच ठिकाणी).

Council for the Indian School Certificate Examinations कडून यंदा जरी परीक्षा 2 सेमिस्टर मध्ये घेण्यात आली असली तरीही पुढील शैक्षणिक वर्गासाठी ती पुन्हा एकाच टर्म मध्ये घेतली जाणार आहे.