CBSE | (Photo Credit: ANI)

यंदा कोरोना संकटाच्या सावटाखाली सीबीएससी बोर्डाच्या (CBSE Board) विद्यार्थ्यांनी दोन टर्म मध्ये 10वी,12वीच्या परीक्षा दिल्या आहेत. सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आता या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता आहे. अद्याप सीबीएससी बोर्डाने परीक्षा निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. परंतून लवकरच निकाल जाहीर होणार आहे. निकालापूर्वी बोर्डाने Pariksha Sangam हे नवं पोर्टल जारी केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी परीक्षेच्या निगडीत सारी माहिती दिली जाणार आहे. त्यामध्ये टर्म 2 चा निकाल देखील आहे.

सीबीएससी बोर्डाचं परीक्षा संगम पोर्टल parikshasangam.cbse.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये 3 भाग आहेत. शाळा (गंगा), रिजनल ऑफिसेस (यमुना) आणि हेड ऑफिस (सरस्वती) आहे.

शाळा सेक्शन मध्ये परिपत्रके, अभ्यासक्रम, नमुना पेपर इत्यादी परीक्षा संदर्भ साहित्यासाठी पर्याय आहेत; OASIS, परीक्षा नोंदणी इ. सारख्या पूर्व परीक्षा अभ्यासक्रम ; परीक्षा अभ्यासक्रम जसे की अंतर्गत गुण अपलोड करणे; परीक्षेनंतरच्या अभ्यासक्रम जसे की निकालांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज, डिजीलॉकरमध्ये प्रवेश, इतर यांचा समावेश आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार जुलै महिन्यात 10वी,12वीचे निकाल जाहीर करण्याचा बोर्डाचा मानस आहे. मात्र अद्याप तारीख, वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. जेव्हा निकाल जाहीर केला जाईल तेव्हा तो cbseresults.nic.in, cbse.gov.in, results.gov.in, digilocker.gov.in या वेबसाईट वर जारी केला जाणार आहे.