ICAI CA Intermediate Result 2021 for July Session Declared: आयसीएआय सीए इंटर परीक्षेचा निकाल icai.nic.in वर असा पहा
निकाल। File image

ICAI कडून यंदा जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या CA Intermediate 2021 चा निकाल जाहीर केला आहे. जुन्या आणि नव्या अशा दोन्ही कोर्सचा निकाल आता अधिकृत वेबसाईटवर आज (19 सप्टेंबर) icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org यावर जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान वेबसाईटवर काही वेळापूर्वीच निकाल जाहीर झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा CA Intermediate 2021 चा निकाल पहायचा आहे त्यांना icaiexam.icai.org वर आपला email ID रजिस्टर करायचं आहे. (नक्की वाचा: CA December 2021 Exam: ICAI कडून यंदा डिसेंबर महिन्यात होणार्‍या परीक्षांचं वेळापत्रक जारी; icaiexam.icai.org वर पहा तारखा).

ICAI CA Inter result 2021 कसा पहाल?

  • ICAI च्या अधिकृत वेबसाईट्सला भेट द्या.
  • होमपेज वर ‘announcements’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता नवी विंडो ओपन होईल. त्यावर जुना, नवा तुमचा जो कोर्स असेल तो निवडा.
  • आता निकाल पाहण्यासाठी अत्यावश्यक माहिती भरा.
  • तुमच्या स्क्रिन वर निकाल दिसेल.
  • तुम्ही निकाल डाऊनलोड करून प्रिंट आऊट देखील घेऊ शकता.

दरम्यान यंदा निकालावर विद्यार्थ्यांचं नाव, कोर्सचं नाव आणि इतर डिटेल्स योग्य आहेत का? हे तपासण्याचं आवाहन आहे. त्यामध्ये काही चूका असल्यास संबंधित अथॉरिटीच्या ही बाब निदर्शनास आणून देण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

ICAI कडून CA December 2021 exam ची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 सप्टेंबर पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतरही लेट फी भरून 3 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यासाठी 600 रूपये फी असणार आहे. ICAI CA foundation, intermediate आणि final exam यंदा 5 डिसेंबरला सुरू होणार असून 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.