CA December 2021 Exam: ICAI कडून यंदा डिसेंबर महिन्यात होणार्‍या परीक्षांचं वेळापत्रक जारी; icaiexam.icai.org वर पहा तारखा

न्यू एक्झाम स्किम प्रमाणे फाऊंडेशन एक्झाम ही 13,15,17 आणि 19 डिसेंबरला होणार आहे. नव्या आणि जुन्या कोर्सच्या Intermediate exams या 6 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. तर नव्या, जुन्या कोर्सच्या फायनल एक्झाम या 5 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत.

CA December 2021 Exam: ICAI कडून यंदा डिसेंबर महिन्यात होणार्‍या परीक्षांचं वेळापत्रक जारी;  icaiexam.icai.org वर पहा तारखा
Examination | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

The Institute of Chartered Accountants of India (ICAI) कडून यंदा डिसेंबर महिन्यात होणार्‍या CA foundation, intermediate आणि final exams साठी वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. जारी करण्यात आलेल्या या वेळापत्रकानुसार, न्यू एक्झाम स्किम प्रमाणे फाऊंडेशन एक्झाम ही 13,15,17 आणि 19 डिसेंबरला होणार आहे. नव्या आणि जुन्या कोर्सच्या Intermediate exams या 6 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. तर नव्या, जुन्या कोर्सच्या फायनल एक्झाम या 5 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थी या परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात.

Insurance Risk Management (IRM) टेक्निकल एक्झाम या 1 ते 4 मॉड्युल्स साठी 5,7,9 आणि 11 डिसेंबर पर्यंत होणार आहे. दरम्यान पेपर दोन शिफ्ट्स मध्ये होणार आहेत. पहिला पेपर दुपारी 2 आणि दुसरा 5 वाजता होणार. तर तिसरा आणि चौथा पेपर दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार आहे. नक्की वाचा: CA Foundation December 2021 Exams: ICAI कडून Registration Deadline 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ.

सध्या foundation, intermediate आणिfinal exams साठी अर्ज करण्याकरिता 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी icaiexam.icai.org या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करू शकतात.

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2021 09:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).