Representational Image (Photo Credits: PTI)

इंस्ट्यिट्युट ऑफ चार्टेड अकाउंटस ऑफ इंडिया (ICAI) यांनी सीए परीक्षेसाठी (CA Exam 2020) अॅडमिट कार्ड जाहीर केले आहे. त्यामुळे जे विद्यार्थी या महिन्यात सीएची अंतिम वर्षाची परीक्षा आणि सीए इंटरमिडीएट ची परीक्षा देणार आहेत त्यांनी icaiexam.icai.org आणि icai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आलेली केंद्रे ही उत्तम नसल्याच्या तक्रारी आता समोर आल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, त्यांना कोविड19 केअर सुविधेच्या ठिकाणी तर काहींना बेकरी आणि कॅफे मध्ये परीक्षेचे केंद्र दिले गेले आहेत. अशा पद्धतीचे परीक्षा केंद्रे दिल्याने सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात आला आहे. या बद्दल ट्विटरवर बहुतांश जणांनी #CAExams चा हॅशटॅग वापरत त्यांना परीक्षेसाठी दिलेल्या केंद्राबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.(IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल मध्ये 482 जगांसाठी नोकर भरती, 12 वी पास उमेदवार ही अर्जासाठी ठरणार पात्र)

कोरोना व्हायरसमुळे आयसीएआयची परीक्षा मे महिन्यात स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये ही होणार होती. मात्र अखेर नोव्हेंबर 2020 मध्ये पार पडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षेचे अॅडमिट कार्ड आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासता येणार आहे. आयसीएसच्या अॅडमिट कार्डच्या येथे विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे केंद्र आणि वैयक्तित माहिती सुद्धा दिसून येणार आहे.

विद्यार्थ्यांना देण्यात आलेली परीक्षा केंद्रे ही अत्यंत वाईट बाब असून सध्या कोरोनाची परिस्थिती सुद्धा अद्याप कायम आहे. तसेच सीए परीक्षेसाठी कोविड19 च्या संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियम आणि अटींचे पालन करावे असे म्हटले आहे. परंतु विद्यार्थ्यांकडून भलतेच काहीतरी ऐकायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी सीए अॅडमिट कार्ड 2020 चे स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात परीक्षेचे केंद्र हे कंन्टेंटमेंट झोन असल्याचे ही त्यांनी दाखवून दिले आहे. यामधील काही जणांना कोविड19 केअर सुविधेच्या ठिकाणी परीक्षा केंद्र, तर काहींना बेकरीची दुकाने, सायबर कॅफेसह प्राथमिक शाळेत परीक्षेसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.(SSC, HSC Re Examination 2020: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये; अर्ज भरण्याची मुदत, पद्धत घ्या जाणून)

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

आयसीएआय कडून यावर अद्याप कोणतेही विधान किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र विद्यार्थ्यांनी ट्विटरवर #CAExams हॅशटॅग वारंवार वापरल्याने तो ट्रेन्ड होत आहे. तसेच परीक्षेचे केंद्र बदलून द्यावे अशी सुद्धा मागणी केली जात आहे. कारण कोरोनाच्या काळात अशा पद्धतीचे परीक्षा केंद्रे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात अशा ही तक्रारी करण्यात आल्या आहेत. तर देशभरात नोव्हेंबर 2020 रोजी सीएच्या परीक्षा पार पडणार आहेत.