IBPS मध्ये 1163 पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Representational Image (Photo Credits: File Photo)

सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असल्यास ही बातमी फार महत्वाची आहे. कारण इंस्टीट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांनी स्पेशालिस्ट ऑफिसर यांचे अर्ज मागण्यात आले आहेत. या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार असून लेखी परिक्षा सुद्धा असणार आहे. आयबीपीएस यांनी विजिटिंग डॉक्टर्स आणि स्पेशल ऑफिसर्स, मार्केटिंग ऑफिसर, एचआर/ पर्सनल ऑफिसर, लॉ ऑफिसर, राजभाषा अधिकारी, एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर आणि आयटी ऑफिसरच्या 1163 पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रियेबाबत अधिक जाणून घ्या.

>>वयाची मर्यादा

20 ते 30 वर्ष असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. आरक्षण असलेल्या उमेदवारांना वयाच्या अटीनुसार सूट दिली जाणार आहे.

उमेदवाराची या पदासाठी निवड करण्यापूर्वी लेखी परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मुख्य परिक्षा येत्या 29 आणि 30 डिसेंबरला पार पडणार असून त्याचा निर्णय पुढील वर्षात जानेवारी महिन्यात लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना अधिक माहिती https://www.ibps.in/ येथे मिळणार आहे.(Indian Army मार्फत मिलिटरी नर्सिंग कोर्स पदांच्या 220 जागांसाठी भरती)

तसेच  दक्षिण मध्ये रेल्वेत नोकरी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीच्या अर्जाची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2019 ठेवण्यात आली आहे.  दक्षिण मध्य रेल्वेत 4,103 रिक्त पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. तर दक्षिण मध्य रेल्वेत नोकर भरतीसाठी 10 वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

नोकरभरती एमएमडब्लू, एमएमटीएम, पेंटर, एसी मॅकानिक, इलेक्ट्रिकल, कारपेन्टर, डिझेल मशीन, इलेट्रिशनस, इलेक्ट्रॉनिक मशीन, फिटर, मॅकानिस्ट आणि वेल्टर पदासाठी असणार आहे. तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10 वी पास सर्टिफिकेश आणि आयटीआय संबंधित प्रमाणपत्र असावे