Maharashtra HSC and SSC Board 2022 Exam Dates: दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 4 मार्चला 12 वीची, तर 15 मार्चला 10 वीची परीक्षा सुरुकोरोना विषाणूचा (Coronavirus) शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. ऑनलाईन वर्गापासून ते परीक्षाही ऑनलाईन होत आहेत. यंदा दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत बराच संभ्रम निर्माण झाला होता. आता शिक्षण विभागाने 2022 मध्ये होणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अभिप्राय आणि विविध भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांसाठीचे हे वेळापत्रक जाहीर केले आहे.
त्यानुसार, इयत्ता 12 वीच्या लेखी परीक्षा 4 मार्च 2022 ते एप्रिल 07 2022 या कालावधीत ऑफलाइन होतील आणि इयत्ता 10 वी च्या परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत ऑफलाइन होतील. कोविड-19 मुळे, याआधी अभ्यासक्रमात 25% कपात करण्यात आली होती, त्यामुळे प्रश्न हे फक्त या कमी केलेल्या अभ्यासक्रमातीलच असतील. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. एचएससी आणि एसएससीसाठी प्रॅक्टिकल, ग्रेड/तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन (स्थापित प्रोटोकॉलनुसार) अनुक्रमे फेब्रुवारी 14 ते मार्च 3, 2022 आणि 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 दरम्यान होणार आहे. (हेही वाचा: BMC च्या 11 शाळांना CBSE Board ची मान्यता; इथे पहा यादी)
Written exams of Std 12th (HSC) will be held offline from March 4,2022 to April 07,2022, & those of Std 10th (SSC) will be held offline from March 15, 2022 to April 18, 2022. Due to COVID-19,the curriculum was earlier cut by 25%.Questions will only be from this reduced syllabus pic.twitter.com/Sat6AbhaGC
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ शिक्षण लवकरच तपशीलवार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करेल. गायकवाड यांनी असेही सांगितले आहे की, जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल आणि जुलै 2022 च्या 2 ऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. सर्व परीक्षा कोविड-19 सुरक्षा नियमांचे पालन करून घेतल्या जाणार आहेत.
Dates of praticals, orals & internal examinations for out-of-turn candidates (HSC, SSC), Information Technology & General Knowledge online paper(HSC), & work education subject exams for specially abled candidates (SSC) are as given below.#exams #Students
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
शेवटी वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि कल्याण हे आमचे प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांना पोषक वातावरण सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि तज्ञ यांच्याशी मूल्यमापन पद्धती आणि परीक्षेचे वेळापत्रक याबद्दल सल्लामसलत केली असून, त्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.’