Himachal Board 12th Results: बिहार बोर्ड (Bihar Board) परिक्षेचा निकाल लागल्यानंतर आता हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) 12 वी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. तर येत्या 22 एप्रिल रोजी हा निकाल विद्यार्थ्यांना hpbose.org या संकेतस्थळावरुन पाहता येणार आहे.
तर गेल्या वर्षी 2018 मध्ये 24 एप्रिल रोजी हिमाचल बोर्ड बारावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तसेच 98 हजार 281 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 68 हजार 469 विद्यार्थी गेल्या वर्षात उत्तीर्ण झाले होते. तर यंदाच्या बारावी बोर्ड परिक्षेसाठी राज्यातील 95 हजार 497 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. तर आता विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.(हेही वाचा-SSC, HSC Exam Result 2019: 12 वीचा निकाल मे महिन्यात तर 10 वीचा निकाल जून महिन्यात लागण्याची शक्यता)
12वी बोर्डाची परिक्षा 6 मार्च पर्यंत पार पडली. तर 10 वी बोर्ड परिक्षा 7 मार्च-20 मार्च पर्यंत पार पडली. हिमाचल प्रदेशात बोर्डाचे केंद्र 1968 मध्ये सुरु करण्यात आले होते. यापूर्वी त्यांचे कार्यलय शिमला येथे होते. त्यानंतर 1983 मध्ये धर्मशाला येथे हलवण्यात आले. तर या बोर्ड अंतर्गत जवळजवळ 8 हजारपेक्षा शाळा कार्यरत आहेत.