Institute of Company Secretaries of India कडून यंदा डिसेंबर महिन्यात झालेल्या CS December 2021 Professional आणि Executive परीक्षेचा निकाल 25 फेब्रुवारी दिवशी जाहीर केला जाणार आहे. उमेदवरांना त्यांचा निकाल ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu वर पाहता येणार आहे.
आयसीएसआय CS Professional परीक्षेचा निकाल सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार आहे. तर CS Executive परीक्षेचा निकाल दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे. दरम्यान जुना आणि नवा अभ्यासक्रमाचा निकाल एकाच दिवशी जाहीर केला जाणार आहे. ICAI च्या माहितीनुसार, निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयानुसार मार्कांचा ब्रेक अप पाहता येणार आहे. निकालाची विद्यार्थ्यांना फिजिकल कॉपी मिळणार नाही. नक्की वाचा: राष्ट्रीय शिक्षण साधन आणि गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेला केंद्र सरकार कडून अजून 5 वर्ष मंजुरी .
कसा पाहाल निकाल?
- icsi.edu या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
- होमपेजवर “CS Result December 2021” वर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन क्रेडेंशिअल टाका.
- तुमच्या स्क्रिनवर CS December result दिसेल.
- तुमचा निकाल प्रिंट आऊट काढून ठेवू शकता.
ICAI ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील Executive and Professional परीक्षा यंदा 10 जून 2022 दिवशी होणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन 26 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहे.