Exams | Representational Image (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालयांच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी युपीएससी (UPSC) आणि एमपीएससीच्या (MPSC) परिक्षा रद्द करण्यात आल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. मात्र पीआयबी महाराष्ट्र यांनी याबाबत अधिक खुलासा केला असून परिक्षा रद्द करण्यात आल्या नाहीत. पण त्या संदर्भातील नोटीस संकेस्थळावर जाहीर केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. देशभरातील एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने स्पष्ट केला आहे. याच पार्श्वभुमीवर आता येत्या 3 मे रोजी युपीएससीच्या परिक्षेसंदर्भात नव्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयोगाने 3 मे 2020 नंतर सिव्हिल सेवा 2019 साठीचे इंटरव्यू आणि अन्य परिक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या कारणामुळे युपीएससीकडून काही परिक्षा आणि इंटरव्यू स्थगित करण्यात आले होते. तर सिव्हिल सेवा परिक्षा 2019 साठी इंटरव्हू 17 फेब्रुवारी पासून सुरु होणार होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे त्या स्थगित करण्यात आल्या होत्या. 2019 मधील युपीएससी परिक्षेत एकूण 2304 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. जे आता इंटरव्हू मध्ये सहभागी होणार होते.(Coronavirus Lockdown मध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान भरुन काढण्यासाठी NCERT ने लॉन्च केलं शैक्षणिक कॅलेंडर; जाणून घ्या कशी डाऊनलोड कराल PDF)

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा होणार की नाही याबद्दल साशंकता होती. जर यावर्षी कोरोनामुळे या परीक्षा रद्द झाल्या, तर या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. त्यांच्यावर अन्याय होईल, असे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते.