Coronavirus Lockdown मध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान भरुन काढण्यासाठी NCERT ने लॉन्च केलं शैक्षणिक कॅलेंडर; जाणून घ्या कशी डाऊनलोड कराल PDF
Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

कोरोना व्हायरसची वाढती साखळी तोडण्यासाठी देश 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशा परिस्थिती घरात मुले कंटाळू नयेत म्हणून पालक विविध शक्कल लढवत आहेत. शाळा, महाविद्यालये बंद असली तरी आपण ऑनलाईन माध्यमातून नक्कीच शिकू शकतो. हीच बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ नये म्हणून National Council Of Educational Research And Training यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑानलाईन कॅलेंटरची निर्मिती केली आहे. यात विद्यार्थ्यांना एखादा विषय रंजक करुन शिकवण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. तसंच घरबसल्या तुम्ही याचा लाभ घेऊन विविध विषय शिकू शकता. त्यामुळे लॉकडाऊनमुळे मिळालेला वेळ सत्कारणी लागेल आणि कंटाळा देखील दूर होईल. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी NCERT चं हिंदी कॅलेंडर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मोबाईल, रेडिओ, टीव्ही, एसएमएस आणि सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवरुन तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. या कॅलेंडरमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या कॅलेंडरचा लाभ दिव्यांग विद्यार्थीही अगदी सहज घेऊ शकतात. यात ऑडिओ बुक्स, रेडिओ कार्यक्रम याद्वारे मुलांना शिकवले जाईल. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी NCERT चं इंग्रजी कॅलेंडर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

या कॅलेंटरमध्ये पुढील चार आठवड्यांसाठी अभ्यासाचा प्लॅन तयार आले आहे. तसंच एखादा धडा, टॉपिक विद्यार्थ्यांना कसे शिकवाल याचे मार्गदर्शन यात करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात कंटाळा टाळण्यासाठी मुलांसोबत तुम्ही कोणत्या अॅक्टीव्हीटीज करु शकता, मानसिक ताण कसा कमी करु शकता याची ही माहिती देण्यात आली आहे. तसंच शैक्षणिक अभ्यासासोबत कलेचे शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण देण्यासाठीही विशेष अभ्यासक्रमाचा यात समावेश करण्यात आला आहे.