CBSE Board Class 10th, 12th Exam Date 2020: सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक 'या' दिवशी होणार जाहीर
Representational Image (Photo Credits : PTI)

CBSE Board Class 10th, 12th Exam Date 2020: कोरोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या काही विषयांचा परिक्षा होऊ शकला नाहीत. मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांची परिक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे दहावी, बारावीच्या उर्वरित राहिलेल्या विषयांच्या परिक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली होती. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्यापूर्वी काही अतिरिक्त तांत्रिक बाबी विचारात घेत आहे, त्यामुळे आज संध्याकाळी पाच वाजता जाहीर होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आता सोमवारी (18 मे 2020) रोजी जाहीर करण्यात येईल, असे ट्वीट निशांक यांनी नुकतेच केले आहे.

दहावीच्या परीक्षा केवळ ईशान्य दिल्लीतील शाळांमध्ये होणार आहेत. तर, देशातील इतर भागात दहावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाही. तसेच बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा संपूर्ण देशभरात होतील. सीबीएसई बोर्डाच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा 1 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत होतील, अशी माहिती निशांक यांनी गेल्या आठवड्यातच ट्वीटरच्या माध्यामातून दिली होती. हे देखील वाचा- विमान व्यवसाय क्षेत्रातून प्रतिवर्षी 1000 कोटींचा नफा मिळवण्यासाठी होणार 'हे' बदल- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

रमेश पोखरियाल निशांक यांचे ट्वीट-

कोरोनाच्या संकटामुळे सीबीएसई बोर्डाच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांबाबत अनिश्चितता होती. पण आज ही अनिश्चिततता दूर करुन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत आहोत. असे ट्वीट निशांक यांनी शनिवारी सकाळी केले होते. त्यानंतर आता वेळापत्रक जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.