CBSE CTET 2021 Exam: रविवारी होणार सीटीईटी परीक्षा; उमेदवारांना करावं लागणार 'या' नियमांचे पालन
Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

CBSE CTET 2021 Exam: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सीटीईटी (CTET 2021) उद्या अर्थात 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. परीक्षा घेत असलेल्या सीबीएसई बोर्डाने या संदर्भातील उमेदवारांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मंडळाने https://ctet.nic.in/webinfo/Public/Home.aspx या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात उमेदवारांना सूचना दिल्या आहेत. उमेदवार येथे भेट देऊन संपूर्ण अधिसूचना तपासू शकतात. या व्यतिरिक्त आपण खाली दिलेली मार्गदर्शक सूचना देखील वाचू शकता. (वाचा - CBSE Board Exams 2021 Datesheet Update: मोठी बातमी! 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार CBSE च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक)

CBSE CTET 2021 Exam: उमेदवारांनी 'हे' मार्गदर्शक तत्त्वे लक्षात ठेवावेत

  • उमेदवारांना 50 मि.ली. पारदर्शक बाटलीमध्ये स्वतःचे सेनेटिझर आणावे लागेल.
  • उमेदवारांना मास्क आणि ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक असेल.
  • पाण्याची बाटली देखील पारदर्शक असावी.
  • उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र आणि कोणतीही ओळखपत्र जसे की आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवावे.
  • उमेदवारांनी परीक्षा केंद्रात येण्यासाठी सुरक्षित वाहतुकीचा अवलंब करावा.
  • उमेदवारांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.
  • उमेदवारांनी अज्ञात लोकांना भेटणे टाळले पाहिजे.

उमेदवारांनी परीक्षेला जाण्याअगोदर स्वत: ला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. उमेदवारांनी सीटीईटी 2021 परीक्षेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. यामध्ये पेपर -1 मध्ये 150 गुणांचे 150 प्रश्न विचारले जातील. यामध्ये बालविकास व शिक्षणशास्त्र, भाषा 1, भाषा 2, गणित, पर्यावरण अभ्यास यांच्याशी संबंधित 30-30 प्रश्न विचारले जातील.

त्याचबरोबर पेपर -2 मध्ये 150 गुणांचे प्रश्न विचारले जातील. या परीक्षेसाठी 24 जानेवारी ते 9 मार्च 2020 पर्यंत नोंदणी झाली होती. याच्या आधारे ही परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार होती. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर 31 जानेवारी रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आलं. त्यानुसार, बोर्डाने उद्या परीक्षा घेण्याचं जाहीर केलं आहे.