CBSE Board Result 2023

CBSE बोर्डाचा Compartment Exam Results 2023 आता कधीही जाहीर होऊ शकतो. जुलै महिन्यात 10वी, 12वीच्या Compartment Exam पार पडल्या आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता त्यांच्या निकालाच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. CBSE ची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. सोबतच cbseresults.nic.in आणि  results.cbse.nic.in वर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. नक्की वाचा: Delhi 16 Years Olds Suicide: पालकांच्या अपेक्षा पुर्ण करू शकत नसल्याच्या नैराश्यातून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या .

दहावीची कम्पार्टमेंट परीक्षा 17 ते 22 जुलै दरम्यान झाली आहे तर 12वीची परीक्षा 17 जुलै दिवशी झाली आहे. आता पहा तुमचा निकाल वेबसाईट वर कसा पहाल?

कसा पहाल तुमचा Compartment Exam Results 2023 ?

  • अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर क्लिक करा.
  • त्यानंतर होमपेजवर "CBSE Compartment Results 2023" च्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स टाका. मग तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
  • निकालाची प्रत सेव्ह करून, डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट देखील काढता येऊ शकते.

गेल्या वर्षी दहावीच्या कंपार्टमेंटचा निकाल प्रथम जाहीर झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर झाला होता. CBSE सहसा परीक्षेनंतर 10-15 दिवसांत कंपार्टमेंट निकाल जाहीर करते. दरम्यान Compartment Exam Results पाहण्यासाठी आवश्यक माहितीमध्ये विद्यार्थ्यांकडे Roll number, School number, Date of birth आणि Admit card ID माहिती असणं आवश्यक आहे.