CBSE '10'वीच्या परीक्षा अभ्यासक्रमात होणार बदल, 2019-20 पासून समाजशास्त्र विषयातील या प्रश्नांना लागणार कात्री!
Representational Image (Photo Credits: All India Radio News/ Facebook)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)चा दहावी इयत्तेचा विस्तृत अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात बदलणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही विषयांमधील प्रश्न हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये होणाऱ्या दहावीच्या (CBSE) बोर्डाच्या परीक्षेत समाजशास्त्र (Social Science) विषयाच्या प्रश्नांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

या प्रश्नांना वगळणार

समाजशास्त्रात यापुढे लोकशाही( Democracy), लोकशाहीच्या पुढील सामाजिक समस्या (Issues In Democracy),काही राजकीय प्रसिद्ध संघर्ष आणि आंदोलन (Political Movements), फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ (Forest And Wild Life), वॉटर रिसोर्सेस (Water Resources)अभ्यासक्रमावरील प्रश्न विचारले जाणार नाहीत,असा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती देणारे एक पत्रक नुकतेच (CBSE)बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे, यंदाच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या दहावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यावर याबाबतची माहिती (CBSE)बोर्डाच्या शाळांना देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या पत्रकानुसार विद्यार्थ्यांना या विषयावरील प्रश्न हे केवळ चाचणी परीक्षेत विचारले जाणार असून बोर्डाच्या परीक्षेतून वगळण्यात येणार आहेत. SSC, HSC Exam Result 2019: 12 वीचा निकाल 20 मे नंतर,10 वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात mahahsscboard.maharashtra.gov.in वर लागणार

शिक्षकांनी घेतला आक्षेप

विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाचा तणाव कमी करण्यासाठी देशभरातील निवडक शैक्षणिक संस्थ, विद्यार्थी व शिक्षकांनीचर्चा करून हा निर्णय घेतल्याचं पत्रकात सांगितलं असलं तरी काही शिक्षकांनी यावर आक्षेप घेतला आहे. या बदलामुळे विद्यार्थी निष्काळजी होऊन या महत्वाच्या विषयांना गंभीरपणे अभ्यास करणार नाहीत, असं मत या शिक्षकांनी मांडलं आहे.