देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे टेंन्शन आले होते. परंतु आता आज संध्याकाळी 5 वाजता सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी (CBSE Board Exam) बसलेल्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तारखांचे वेळापत्रक (Datesheet) जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी अधिक माहिती दिली आहे. तर कोणत्या विषयांची पेपर कधी असणार आहे हे स्पष्ट केले जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने यापूर्वी असे म्हटले होते की, राहिलेल्या विषयांची परिक्षा घेण्यात येणार नाही. फक्त सीबीएईकडून बनवण्यात आलेल्या विषयांच्या लीस्टनुसार त्या विषयांचे पेपर होणार आहे. यामध्ये 29 विषयांचा समावेश करण्यात आला असून ती लीस्ट cbsc.nic.in येथे देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोरोनाचे देशावरील संकट पाहता सीबीएसईच्या राहिलेल्या विषयांच्या पेपर बाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आज ही अनिश्चितता दूर करत आणि विद्यार्थांचा उत्साह पाहता इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परिक्षांची डेट शीट संध्याकाळी आज जाहीर करणार आहोत.(CBSE Board Exams 2020 Dates: 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणार दहावी आणि बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा, ऑगस्टमध्ये येणार निकाल)
Datesheet for CBSE Board Examinations for Class 10th and 12th to be released today at 5.00 pm: Union Minister for Human Resource Development Ramesh Pokhriyal (file pic) pic.twitter.com/iB7ejLjYY9
— ANI (@ANI) May 16, 2020
यापूर्वी पोखरियाल यांनी सीबीएसई 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार आहे. आणि निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होईल असे म्हटले होते. तसेच 9 वी आणि 11 वी साठीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत असे म्हटले होते की, जर विद्यार्थी एखाद्या परीक्षेत नापास झाल्यास त्याला त्याची परिक्षा पुन्हा देता येणार आहे. तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आर्ट आधारित प्रोजेक्टमध्ये सहभागी करणार असल्याचे म्हटले होते.