सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) उर्वरित दहावी (10th) आणि बारावी (12th) परीक्षा जुलैमध्ये घेणार आहे. सीबीएसई 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार आहे. आणि निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होईल. सीबीएसईच्या उर्वरित परीक्षेसाठी विद्यार्थी बरीच प्रतीक्षा करत होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी लावलेल्या लॉकडाउनमुळे त्याची परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. त्यांनी या परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करीत असलेले विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, परीक्षेचे वेळापत्रक केव्हाही जाहीर केले जाऊ शकते. 5 मे रोजी मंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ज्यात त्यांनी बोर्डाच्या परीक्षा घेतल्यानंतरच स्पर्धा परीक्षा घेण्यात येतील असे म्हटले होते. JEE च्या वेळापत्रकांतर सीबीएसई परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर झाले आहे. (JEE Advanced 2020 Exam Date: जेईई-ऍडव्हान्स परीक्षा 23 ऑगस्ट रोजी- रमेश पोखरियाल यांची माहिती)
सीबीएसई बोर्ड 12 वीच्या विद्यार्थ्यांचे व्यवसाय अभ्यास, भूगोल, हिंदी इलेक्टीव्ह, हिंदी कोर, गृह विज्ञान, समाजशास्त्र, संगणक विज्ञान, (ओल्ड), संगणक विज्ञान (नवीन), इन्फॉर्मशन प्रॅक्टिस (ओएलडी) इन्फॉर्मशन प्रॅक्टिस (नवीन), माहिती तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी विषयांच्या परीक्षा बाकी आहेत. दुसरीकडे, ईशान्य दिल्लीतील दंगलीमुळे काही केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत, उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचारामुळे परीक्षा घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त दहावीची परीक्षा असेल. ईशान्य दिल्लीत दहावीच्या विद्यार्थ्यांना आता हिंदी कोअर ए, हिंदी कोअर बी, इंग्लिश कॉमन, इंग्लिश भाषा आणि साहित्य, विज्ञान, सामाजिक विज्ञान या विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे.
लंबे समय से #CBSE की 10वीं और 12वीं की बची हुई परीक्षाओं की तिथि का इंतज़ार था, आज इन परीक्षाओं की तिथि 1.07.2020 से 15.07.2020 के बीच में निश्चित कर दी गई है। मैं इस परीक्षा में भाग लेने वाले सभी विद्यार्थियों को अपनी शुभकामनाएं देता हूँ।@HRDMinistry @PIB_India @DDNewslive pic.twitter.com/NVexiKgVA1
— Dr Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) May 8, 2020
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे, जो 17 मे पर्यंत राहील. लॉकडाउनमुळे देशभरातील उर्वरित बोर्डाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.