केंद्रीय मनुष्यबळ आणि संसाधन (HRD) मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' (Ramesh Pokhriyal) यांनी आज जेईई ऍडव्हान्स परीक्षेची तारीख जाहीर केली. दरम्यान लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेलीजेईई-ऍडव्हान्सची परीक्षा 23 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल असे केंद्रीय मनुष्यबळ आणि संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले. यावर्षी JEE (Mains) परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान घेण्यात येईल, असे पोखरीयाल यांनी यापूर्वी जाहीर केले होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यापूर्वी जेईई मेन 2020 च्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. तारखांच्या घोषणेमुळे आता विद्यार्थ्यांमधील परीक्षांविषयीची शंका दूर झाली असून विद्यार्थ्यांना त्यांना योग्य प्रकारे तयारी करता येणार आहे. यापूर्वी परीक्षा एप्रिल 5,7,8 आणि 11 रोजची घेतण्यात येणार होत्या. जेईई आणि नीट परीक्षांबद्दल माहिती देताना पोखरियाल म्हणाले की, JEE Main 2020 परीक्षा 19-23 जुलै दरम्यान आणि NEET 2020 परीक्षा 26 जुलै दिवशी होईल असे म्हटले होते. यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस परीक्षा घेतल्या जातील असं सांगण्यात आलं होतं. (JEE Main and NEET 2020 Exams Dates: जेईई मेन्स यंदा 19-23 जुलै दरम्यान होणार, JEE Advanced ऑगस्ट तर NEET 2020 परीक्षा 26 जुलै दिवशी!)
केंद्र सरकारने 16 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केल्या पासून विद्यापीठे व शाळा बंद करण्यात अली होती. नंतर 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन वाढविण्यात आल्याने जेईई परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. देशात लॉकडाउन 17 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.
JEE Advanced Exam will be conducted on August 23: Ramesh Pokhriyal, Union Human Resource Development Minister pic.twitter.com/mZcgiB26GG
— ANI (@ANI) May 7, 2020
दरम्यान, परीक्षांची तारीख जाहीर करण्याबरोबरच या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना आणखी एक सुविधा देण्यात आली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता आता विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देण्यासाठी इतर शहरांमध्ये जावे लागणार नाही. जेईईच्या मुख्य प्रवेश परीक्षेसह विविध शैक्षणिक कार्यक्रमांच्या प्रवेश परीक्षेत ही सुविधा दिली जाईल. आयआयटी संयुक्त प्रवेश मंडळाच्या (जेएबी) रविवारी झालेल्या बैठकीत