JEE Main and NEET 2020 New Exams Dates: केंद्रीय मनुष्यबळ आणि संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेल्या JEE Main, NEET सोबत सीबीएसई परीक्षांच्या तारखेबददल माहिती देण्यात आली. CBSE Exam च्या तारखा अद्याप ठरल्या नसून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल. पण आज लाईव्ह सेशनमध्ये जेईई आणि नीट परीक्षांबद्दल माहिती देताना JEE Main 2020 परीक्षा 19-23 जुलै दरम्यान होणार तर JEE Advanced ऑगस्ट महिन्यात होऊ शकते. आणि NEET 2020 परीक्षा 26 जुलै दिवशी होईल अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस परीक्षा घेतल्या जातील असं सांगण्यात आलं होतं. मात्र लॉकडाऊन पुढे ढकलण्यात आल्याने 17 मे पर्यंत देशात संचारबंदी लागू असेल. त्यामुळे हे वेळापत्रकदेखील अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान भारतामध्ये यंदा JEE Main साठी 9 लाख तर NEET 2020 साठी 15.93 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला आहेवैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक नीट ही प्रवेश परीक्षा National Testing Agencyकडून घेतली जाते. पुढील शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रम थोडा कमी केला जाईल. सध्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षातील दिवस कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. National Testing Agency कडून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यासाठी थोडा वाढ वाढवून देणार आहेत.
ANI Tweet
IIT-JEE (Main) examination to be held on 18, 20, 21, 22, & 23 July. IIT-JEE Advance exam to held in August, date to be announced later. NEET exam to be held on 26th July: Ramesh Pokhriyal, Union Human Resource Development Minister pic.twitter.com/uG0P3FbD3b
— ANI (@ANI) May 5, 2020
लाईव्ह वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी Diksha portalपाहत राहण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये परीक्षांच्या तारखा दिल्या जातील. लॉकडाऊन दरम्यानच्या वेळेचा उपयोगविद्यार्थ्यांनी नव्या गोष्टी शिकण्यासाठी करावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.