CBSE Board 10th Result 2021: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार नाही
CBSE | (Photo Credit: ANI)

काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाचे वेध लागले आहेत. दरम्यान आज (2 ऑगस्ट) दहावीचा निकाल लागेल अशी काहींना अपेक्षा होती पण बोर्डाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दहावी निकालाची शक्यता नाही. पण सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल याच आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांची दहावी विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा निकाल सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर अर्थात cbseresults.nic.in वर पाहाता येणार आहे.

सीबीएसई बोर्डाने 12वीचा निकाल 30 जुलैला जाहीर केला आहे. सकाळी अचानक आज निकाल जाहीर होणार असे घोषित करून दुपारी 2 वाजता निकाल जाहीर करण्यात आले होते. त्याच दिवशी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आता दहावी निकालाचं काम देखील सुरू झालं असून आठवड्याभरात निकाल लावले जाणार आहेत.

यंदा परीक्षांच्या दिवसांमध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत होती. अशामध्ये सार्‍याच बोर्डांनी 2020-21 ची दहावी, बारावीची परीक्षा रद्द करून आता अंतर्गत मूल्यमापनाने निकाल लावण्यास सुरूवात केली आहे. CBSE Board 12th Result 2021 Declared: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल 99.37%; cbseresults.nic.in वर असे पहा गुण.

भारतात येत्या काही दिवसात अंदाजे 60 हजार नॉन रेग्युलर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. हे 12 वीचे विद्यार्थी असतील. या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट फॉर्म भरला असल्याने त्यांचा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने निकाल लावणं शक्य नाही. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्रालयाने अशा विद्यार्थ्यांसाठी 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान परीक्षा आयोजित केली आहे.