CBSE Board Class XII Result 2021 Announced: कोरोना संकटामुळे यंदा सीबीएससी बोर्डानेही (CBSE Board) देशभर विद्यार्थ्यांच्या दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द करत आज यंदाच्या वर्षीचा 12वीचा निकाल ऑनलाईन लावला आहे. CBSE बोर्डाचा यंदाचा निकाल 99.37% लागला आहे. दिल्ली विभागाने यंदाच्या निकालात बाजी मारली आहे. यावर्षी 12वी निकालामध्ये 95% च्या वर 70,000 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत तर 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी दीड लाखापेक्षा अधिक आहेत. सकाळीच सीबीएसई बोर्ड दुपारी 2 वाजता 12वीचा निकाल (CBSE Board 12th Result) जाहीर करत असल्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार विद्यार्थी आता त्यांचा निकाल सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकत आहेत. cbseresults.nic.in,cbse.gov.in,results.gov.in यावर विद्यार्थ्यांना मार्क्स पाहता येणार आहेत. दरम्यान यंदा विद्यार्थ्यांना अॅडमीट कार्ड्स दिली नसल्याने अनेकांना त्यांचे रोल नंबर्स ठाऊक नाहीत अशांसाठी बोर्डाने वेबसाईट्सवरच CBSE 12th result roll number finder उपलब्ध करून दिला आहे.
कोरोना संकटामुळे परीक्षा न झाल्याने बोर्डाला पर्यायी मूल्याकन पद्धती अवलंबवावी लागली आहे. सीबीएसई बोर्डाने 40:30:30 या फॉर्म्युलावर यावर्षी निकाल जाहीर केला आहे. त्यामध्ये 12 वी प्री बोर्ड एक्झामचे अंतर्गत मुल्यमापन 40% , 10 वीचा परफॉर्मन्स 30%, 11वीचा परफॉर्मन्स 30% या आधारे निकाल जाहीर झाला आहे.
सीबीएसई बोर्ड 2021 निकाल
CBSE class 12 results:99.37 per cent students pass, no merit list to be announced this year
— Press Trust of India (@PTI_News) July 30, 2021
cbseresults.nic वर कसा पहाल निकाल?
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर registration number, roll number आणि इतर log-in credentials भरा.
- तुम्हांला स्क्रिन वर निकाल पाहता येईल.
- हा निकाल डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.
2019 च्या सीबीएसई बारावीच्या निकालाच्या तुलनेत 2020 च्या निकालामध्ये 95% आणि त्याहून अधिक मार्क्स घेणार्यांचे प्रमाण 118.6% वाढलं होतं तर 90% वर मार्क्स असणार्यांचे प्रमाण 67.48% ने वाढलं होतं. यंदा शाळांकडूनच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांचे मार्क्स सीबीएसईच्या वेबसाईट वर अपडेट करण्यात आले आहेत.
दरम्यान आज 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईला 31 जुलै पूर्वी बोर्डाचे निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे येत्या 1-2 दिवसांत बोर्ड 10वीचा देखील निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.