प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

Indian Army Recruitment 2022: भारतीय लष्करात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लष्कराने 133 ग्रुप सी पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार नाव्ही, चौकीदार आणि आरोग्य निरीक्षक या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. भारतीय लष्कराने 7 मे 2022 रोजी ही अधिसूचना जारी केली होती. उमेदवार 45 दिवसांच्या आत विहित नमुन्यात ऑफलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.

येथे पहा रिक्त जागांचा तपशील -

सैन्यदलाच्या अधिसूचनेनुसार, न्हावीच्या 12 पदांसाठी, चौकीदाराच्या 43 पदे आणि आरोग्य निरीक्षकाच्या 58 पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. श्रेणीनिहाय रिक्त जागा पाहण्यासाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना पाहू शकता. (हेही वाचा - UPSC Calendar 2023: यूपीएससी 2023 परीक्षांचे वेळापत्रक जारी; Civil Services Prelims Exam 28 मे दिवशी; upsc.gov.in वर पहा सविस्तर)

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा -

नाव्ही आणि वॉचमनच्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 10वी उत्तीर्ण असावेत. त्यांना त्यांच्या कामात प्रवीणता असावी. चौकीदार आणि आरोग्य निरीक्षक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी व्यतिरिक्त सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे असावे. आरोग्य निरीक्षक पदासाठी अर्जदारांचे कमाल वय 25 वर्षे असावे.

उमेदवार याप्रमाणे करू शकतात अर्ज -

नाव्ही आणि चौकीदार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज आणि सर्व कागदपत्रे 'Presiding Officer (BOO-I), HQ Southern Command (BOO-I)' या पत्त्यावर पाठवावी लागतील. सर्व कागदपत्रे स्वत: प्रमाणित असावीत. आरोग्य निरीक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना सर्व कागदपत्रे आणि अर्ज 'द कमांडिंग ऑफिसर, 431 फील्ड हॉस्पिटल, पिन- 903431, c/o 56 APO' वर पाठवावा लागेल. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही या भरतीची अधिसूचना वाचू शकता. सैन्याच्या joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर तुम्हाला या भरतीची माहिती मिळेल.