केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेण्यात आले एनडीए परिक्षेत (NDA Exam) महाराष्ट्राच्या (Maharashtra) कन्यारत्नाने बाजी मारली आहे. औरंगाबादच्या अनुष्का बोर्डेने (Anushka Borde) देशात दुसरा क्रमांक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय सैन्यात सामिल होणं ही विचार करायला जेवढी सोपी बाब वाटते तेवढीचं ती स्वत करण्यास अवघड बाब आहे. कारण मुलं देखील हा धाडसी निर्णय घेण्यापूर्वी दहा वेळेस विचार करतात पण मुलगी आणि भारतीय लष्कर हे समीकरण जरा अजून पचायला जड जात पण अनुष्काने हा धाडसी निर्णय घेत एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकादमीची परिक्षा दिली एवढचं नाही तर या परिक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. तरी आपल्या लेकीला थेट भारतीय लष्करात धाडणं हा साहसी निर्णय अनुष्काच्या पालकांनी घेतला आहे. अनुष्का ही सर्वमान्य घरातील लेक असुन तिच्या वडीलांचं स्टेशनरी शॉप आहे तर आई गृहीणी आहे.
अनुष्काने तिच्या यशाचं श्रेय तिचे आईवडील आणि शिक्षकांना दिलं आहे. शालेय जिवनात असल्यापासून अनुष्काला भारतीय लष्कराबाबत (India Army) विशेष आकर्षण होती. त्याबाबत तीने माहिती मिळवली आणि शिक्षण घेतलं अशी माहिती अनुष्काच्या पालकांनी दिली आहे. तरी देशात दुसरी येत लेकीनं फक्त बोर्डे कुटुंबाचचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) नाव काढलं आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Board HSC Exam 2023 Application Last Date: 12वी च्या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 25 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ)
अनुष्का ही परिक्षा पास झाली असली तरी पुढील सगळ्या शारिरीक चाचणींसाठी तयारी करत असल्याची माहिती दिली आहे. अनुष्काचं वय केवळ अठरा वर्ष असुन ती औरंगाबादेतून (Aurangabad) ही परिक्षा पास करणारी एकमेव मुलगी आहे. तिच्या या यशासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून (Maharashtra) तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.