Maharashtra Board HSC Exam 2023 Application Last Date: 12वी च्या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 25 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
online ((Photo Credits: Pexels)

महाराष्ट्र शिक्षण राज्य बोर्डाकडून यंदा 10वी, 12वी च्या परीक्षा जुन्या पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे अद्यापही 10वी,  12वी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला नसल्यास तुम्हांला तो दाखल करण्याची मुभा आहे. खाजगी विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देऊ शकणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेसाठी (Maharashtra Board HSC Exam) ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना फॉर्म भरता येता नव्हता त्यांना आता बोर्डाने दिलासा दिला आहे. 25 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत.

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणार्‍या 12वीच्या परीक्षांसाठी 15 नोव्हेंबरची मुदत होती. पण ऑनलाईन अर्ज भरताना काही त्रृटी जाणवत असल्याने बोर्डाने मुदतवाढ दिली आहे. आता नियमित शुल्कासह 25 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. हे देखील नक्की वाचा: SSC, HSC Form No 17 Registration Last Date Update: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी,12वी च्या परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरणार्‍यांना मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करू शकाल अर्ज .

व्‍यावसायिक अभ्यासक्रम शाखांचे, नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी सारेच आपला फॉर्म भरू शकणार आहे. यामध्ये 25 नोव्हेंबर पर्यंत नियमित शुल्कासह तर विलंब शुल्कासह 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा आहे. शाळा, कॉलेजेसना चलन काढून शुल्‍क बँकेत भरण्याची मुदत 2 डिसेंबरपर्यंत आहे.